" शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात आवाज उठवा " ....
शिक्षण सम्राट आणि खाजगी क्लासेस यांचे नफाखोरी वृत्तीमुळे शिक्षण महाग झाले आहे. ज्यामुळे अनेक लोकांना शिक्षण घेणे शक्य होत नाही आणि त्यामुळे बेरोजगारी वाढली,
शिक्षणाचे बाजारीकरण रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यावर काही खालील उपाय योजना करता येतील
१)शिक्षणावर सरकारी खर्च वाढवून, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
२)शिक्षकांच्या प्रशिक्षणावर आणि शैक्षणिक सुविधांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
३)गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत करणे, तसेच खासगी शाळांमधील शुल्क कमी करणे.
शिक्षणाचे बाजारीकरण ही एक गंभीर समस्या आहे, ज्याचा समाजावर आणि व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होतो. शिक्षणाच्या बाजारीकरणाला आळा घालण्यासाठी आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ॲड.सादीक शिलेदार
नेवासा , अ.नगर
मो.९९७०८१८०७६