नेवासातील नागेबाबा पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराविरोधात चौकशीची मागणी; ७ ऑगस्टपासून आमरण उपोषणाची चेतावणी


नेवासातील नागेबाबा पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराविरोधात चौकशीची मागणी; ७ ऑगस्टपासून आमरण उपोषणाची चेतावणी

नेवासा, ५ ऑगस्ट २०२५:
श्री संत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेमध्ये सुरू असलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांविरोधात शिवाय कांतीला टेमक यांनी सहाय्यक निबंधक (AR), नेवासा यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे. पतसंस्थेत ग्राहकांची लूट, गोरगरिबांना अवाजवी व्याजदराने कर्ज वाटप, इनामी जमिनीवर कर्ज वितरण, आणि डिपॉझिट दिलेल्या जमिनी हडप केल्याचे गंभीर आरोप अर्जात करण्यात आले आहेत.

अर्जात म्हटले आहे की, पतसंस्थेचे पैसे चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येत असून, कर्ज फेडूनही कर्ज बाकी दाखवले जात आहे. याशिवाय, भुखंड व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळ्यांचेही आरोप करण्यात आले आहेत.

शिवाय कांतीला टेमक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कारवाई झाली नाही, तर ते ७ ऑगस्ट २०२५ पासून कर्जदार व ठेवीदारांना घेऊन आमरण उपोषणास बसणार आहेत. सुरुवातीला (AR) ऑफिस, नेवासा येथे उपोषणाची घोषणा करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव हे स्थळ बदलून आता खोलेश्वर मंदिर चौक, नेवासा येथे उपोषण करण्यात येणार आहे.

या अर्जाची प्रत महसूल सहाय्यक, पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक सहकारी संस्था, तहसीलदार नेवासा यांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे.


---


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.