नेवासा येथे नागेबाबा पतसंस्थेच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात मनसेसह विविध संघटनांचे उपोषण सुरू – प्रशासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष!
नेवासा, दि. ७ ऑगस्ट — नेवासा येथे नागेबाबा पतसंस्थेच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमान पक्ष, बहुजन समाजवादी पार्टी तसेच शेतकरी संघटना, अनेक संघटनांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे,टेमक आणि खटाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीव्र उपोषण सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार आणि बुडवलेले पैसे या मुद्द्यांवर संतप्त आंदोलकांनी आवाज उठवला आहे.
उपोषणकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागेबाबा पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराकडे ना प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत आहे, ना पतसंस्थेचे पदाधिकारी जबाबदारी स्वीकारत आहेत. हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष असून, यामध्ये सरकारच्या उदासीनतेविरुद्ध जनआक्रोश दिसून येतो आहे.
या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, स्वाभिमान पक्षाचे गणपतराव मोरे, बसपाचे प्रभारी हरीशदादा चक्रनारायण, शेतकरी संघटनेचे अॅड. ज्ञानेश्वर शिरसाट यांनी पाठिंबा दिला असून, उद्या दिनांक ८ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात निवेदन सादर करून या प्रकरणाची चौकशी व न्याय मागण्यात येणार आहे.
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दत्तू पाटील निकम, प्रमोद जाधव, बापू सौदागर, सागर सांगळे, ओम तोडमल, प्रमोद टेकाळे, डॉ. महेश कुंडारे, गणेश जगरे, तुषार गायकवाड, विनोद वाकचौरे, बापूसाहेब दारकुंडे, संतोष राजगिरे, एनटी वाघ, अॅड. पीसी नहार, अॅड. धिरडे, अॅड. आर. आर. काळे, तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत.
शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, राजेंद्र भुजंग, संतोष लोंढे, अशोक नागवडे, नितीन नागवडे, बाबासाहेब नागवडे, विकास मस्के, दत्तात्रेय काळे पाटील, राम केंदळे, अॅड. भारत चव्हाण, अॅड. धिर्डी आदींचा सक्रीय सहभाग या आंदोलनात पहायला मिळत आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांची मागणी आहे की, पालकमंत्र्यांनी नागेबाबा पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराचा “पडदा फास” करावा आणि पावसाळी अधिवेशनात शनिशिंगणापूर प्रकरण मांडणाऱ्या आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या धाडसाचा आदर्श घेत या प्रकरणाचा देखील पाठपुरावा करावा.
"ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्कांची आहे, याचा शेवट न्याय मिळेपर्यंतच होईल," असा निर्धार करत आंदोलकांनी प्रशासन आणि सरकारला थेट इशारा दिला आहे. आता पालकमंत्र्यांचा पुढचा पाऊल काय असेल याकडे नेवासासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट .
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या नागेबाबा पतसंस्थेचे भ्रष्ट कारभार घोटाळ्याची दखल घेणार का नाही ? व या उपोषणाला भेट देणार का नाही मनसे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार यांचा सवाल?