महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवास्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी भव्य दही हंडी उत्सव!
नेवासा येथे यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक उत्सवासाठी हिंदू हृदय सम्राट महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज (सरलाबेट) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता, नेवासा बस स्टँडजवळ हा उत्सव भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहाने सजलेला असणार आहे. "गोविंदा रे गोपाळा, थरावर चडे आमचा बाळ हंडी फुटे जल्लोषात" या पारंपरिक गजरांनी नेवासा शहराचे वातावरण भक्तिमय होणार असून, हंडी फोड स्पर्धेचा जल्लोष संपूर्ण परिसरात गाजणार आहे. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे Celest उत्सव, ज्यामध्ये नेत्रदीपक लाईट्स आणि प्रचंड साउंड सिस्टीमचा थरार अनुभवता येणार आहे. NO 1 SOUND – NANA 89+ (TISGAV) आणि NO 1 LIGHTS – MK LIGHT यांच्यामार्फत विशेष तांत्रिक सजावट करण्यात आली आहे. उत्सवाचे आयोजन श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती नेवासा यांच्यातर्फे करण्यात आले असून, यासाठी नेवासा तालुक्यातील सर्व नागरिक, युवक, महिला व गोविंदा पथकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा भाग होण्याचे आवाहन केले आहे. या उत्सवातून नेवास्याच्या मातीतून एकतेचा संदेश देत, परंपरा व श्रद्धेचा जागर होणार असून, संपूर्ण शहर कृष्णमय होणार आहे.