नेवासा शहराच्या विकासाला गती : ६ कोटींच्या विकासकामांचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा
नेवासा (प्रतिनिधी) —
नेवासा नगरपंचायत अंतर्गत तब्बल ६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नेवासा नगरपंचायत चौकात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून ही विकासकामे मार्गी लागली आहेत.
या विकासकामांमध्ये नगरपंचायत हद्दीतील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, सौंदर्यीकरण व नागरी सुविधांचा समावेश आहे. या सोहळ्यासाठी महायुतीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या निमित्ताने नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून, येथील नागरी जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
---