नेवासा तालुक्यात पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक व नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड १७ ऑगस्ट रोजी
नेवासा (प्रतिनिधी) –
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या नेवासा तालुका शाखेची नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड व आढावा बैठक रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नेवासा येथील हॉटेल प्रणाम हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव कोलते पाटील प्रमुख उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मा. अशोक थिटे पाटील असतील. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे नेवासा तालुका युनिटमार्फत करण्यात आले आहे.
या आढावा बैठकीमध्ये संघटनेच्या आगामी दिशा, धोरणे, पोलीस पाटलांसाठी प्रवास भत्ता, सभासद नोंदणी प्रक्रिया, व इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला नेवासा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधव व भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. संदीप फाटके पाटील यांनी केले आहे.
---