मा. विजय शेठ दहिवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारोह
नेवासा (१३ ऑगस्ट) – आदर्श विद्या मंदिर, नेवासा येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात प्रसिद्ध सराफ व्यापारी मा. श्री. विजय शेठ दहिवाळकर (नेवासा फाटा) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. बाळासाहेब जायगुडे पाटील, अध्यक्ष – शालेय समिती, आदर्श विद्या मंदिर, नेवासा यांनी भूषवले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. भानुदास पाटील रेडे (सामाजिक कार्यकर्ते) यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच, अनेक मान्यवर पाहुण्यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
ध्वजारोहणापूर्वी प्रभातफेरीचे आयोजन सकाळी ७.०० वाजता करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम आदर्श विद्या श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ, पानसवाडी संचलित आदर्श विद्या मंदिर, नेवासा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
शाळेचे मा. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी सर्व पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.