नेवासा तालुक्यातील आकाश चेडे भाजप तालुका उपाध्यक्षपदी निवड


📰 नेवासा तालुक्यातील आकाश चेडे भाजप तालुका उपाध्यक्षपदी निवड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील युवा नेते आकाश चेडे यांची भारतीय जनता पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील भाजपा नेवासा उत्तर मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना ही निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे, माजी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप नेवासा दक्षिण विभाग मंडलाध्यक्ष प्रताप चिंधे व संभाजी राजे जगताप यांच्या पुढाकाराने आकाश चेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीनंतर आकाश चेडे यांचा तेलकुडगाव, जेऊर हैबती, दिघी, ठिकठिकानी विविध संघटनांच्या वतीने सन्मान. करण्यात आला, भाजपा आयुष्यमान भारत सेल अध्यक्ष, मा, श्री, गणेश ताके पाटील, दिघी गावचे ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ निकम, भाजप युवा नेते अर्जुन कर्डिले, महालक्ष्मी हिवरा कानिफ जगताप, मच्छिंद्र मुंगसे, गौतम शेठ गुगळे, सर्वांचे वतीने जाहीर सत्कार करण्यात आला

या निवडीबद्दल आकाश चेडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, युवा नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी मोलाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. ✅

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.