लोकशाही व राष्ट्र टिकले पाहिजे याकरिता पोलीस पाटलांनी गावचे मालक म्हणून काम केले पाहिजे असे प्रतिपादन नेवासा पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील



नेवासा प्रतिनिधी . लोकशाही व राष्ट्र टिकले पाहिजे याकरिता पोलीस पाटलांनी गावचे मालक म्हणून काम केले पाहिजे असे प्रतिपादन नेवासा पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना केले 
      नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस पाटलांची आज मासिक बैठक पोलीस स्टेशन कार्यालयात पार पडली यावेळी नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस पाटील हा गावचा कणा असून तो गावचा मालक आहे परंतु त्यांनी गावात कायदा व सुव्यवस्था राखताना दारूबंदी सह बालविवाह प्रतिबंधक कायदा याची कठोर अंमलबजावणी करून बालविवाह रोखले पाहिजेत गावातील शेतकऱ्यांचे शिव रस्ते पाणंद रस्ते वहिवाटेचे रस्ते खुले करण्यासाठी मदत करावी शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावावेत गावातील समाजाला न्याय देण्याचे जनतेच्या मनासारखे काम करावे काम करत असताना आपला उद्देश चांगला असावा कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी जातीपातीचे पक्षाचे राजकारण करू नये पक्षीय राजकारण टाळावे चुकीचे काम करू नये असे श्री पाटील म्हणाले यावेळी महाराष्ट्राचे गाव कामगार पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष रमेश डोळे कार्याध्यक्ष संजय वाघचौरे जिल्हा सचिव दिलीप गायकवाड तालुका उपाध्यक्ष विठ्ठल चांगुलपाई जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय दहिफळे यांनी श्री पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी बाळकृष्ण भागवत संजय साठे गणेश सोमोसे संतोष घुंगासे अशोक पुंड मंगल सावंत सविता तुपे साधना काळे रजिया शेख सुभाष भांगे दिलीप पटारे आप्पासाहेब गर्जे आदी पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.