मक्तापूर येथे एकलव्य चौकात आदिवासी दिन साजरा; एकलव्य मूर्तीची पूजन करण्यात आली
नेवासा प्रतिनिधी.नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये एकलव्य चौकात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एकलव्य मूर्तीची पूजा करण्यात आली. पूजन सोहळा मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे आणि एकलव्य नेते दत्तात्रय बर्डे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (शिंदे गट) नेते मनोज झगरे, शरद बर्डे, सोमनाथ साळुंखे, नितीन बर्डे, संभाज हरिभाऊ बडे, अनिल अहिरे, सतीश बर्डे, छबुराव बर्डे, राजेंद्र कोळेकर, प्रदीप साळवे, देवदान साळवे, सचिन कोळेकर, अमोल भागवत, योगेश चव्हाण यांची उपस्थिती होती.
तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे, सरपंच अनिल लहारे, गोरक्षनाथ नवघरे, सर शकूर इनामदार, सचिन गायकवाड यांचाही कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या कार्यक्रमात एकलव्य मित्र मंडळ, छत्रपती मित्र मंडळ, भीमशक्ती मित्र मंडळ यांच्यासह मक्तापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.
---