📰 "नागेबाबा पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराविरोधात नेवासा येथे आंदोलन – उपोषणकर्त्यांचा स्पष्ट इशारा; आमदार लंघे यांच्या भेटीनंतरही निर्णय पुढे ढकलला!"पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी फिरवली उपोषण करणाऱ्यांकडे पाठ, अखेर उपोषण सोडण्यात आले शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ यांच्या मध्यस्थीने सहाय्यक निबंधक घोडेचोर यांच्या कारवाईच्या शब्दामुळे
नेवासा, ८ ऑगस्ट: नागेबाबा पतसंस्थेच्या कथित आर्थिक भ्रष्टाचाराविरोधात नेवासा येथे शिवाय टेमक व ज्योती खटाने यांनी छेडलेल्या उपोषणाला पाठिंबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, स्वाभिमान पक्ष, बहुजन समाज पार्टी, शेतकरी संघटना व शिवसेनेसह इतर संघटनांनी एकत्र येत जोरदार व आक्रमक उपोषण छेडले. शेतकऱ्यांचे प्रश्न, पतसंस्थेतील अपारदर्शक व्यवहार आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात हा लढा उभारण्यात आला होता.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, यावर उपोषणकर्त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, "सदर आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित आघाडी व अन्य संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून होत आहे. त्यामुळे उपस्थित नसलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही."
त्यामुळे, आमदार लंघे यांच्याशी सौजन्यपूर्ण संवादानंतरही उपोषण मागे घेण्याचा निर्णय लगेच घेण्यात आला नाही. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले की सर्व संघटनांचे नेते एकत्र झाल्यावरच पुढील भूमिका ठरवली जाईल. या दरम्यान आमदार विठ्ठलराव लंघे यांनी असे सांगितले की पालकमंत्री आपल्या उपोषणाला भेट देतील व आपल्या समस्या जाणून घेतील पण पालकमंत्र्यांचा ताफा नेवासा तालुक्यातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा करून उपोषणाला न थांबता थेट निघून गेल्यामुळे अनेक चर्चांना नेवासा तालुक्यात उद्यान आले
दरम्यान, उपोषणाला विविध संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळाला होता. उपस्थित प्रमुख नेते व कार्यकर्त्यांमध्ये:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना: तालुका अध्यक्ष दिगंबर पवार
वंचित बहुजन आघाडी: तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे
काँग्रेस: शहराध्यक्ष अंजुम पटेल
स्वाभिमान पक्ष: गणपतराव मोरे
बहुजन समाज पार्टी: प्रभारी हरीश दादा चक्रनारायण
शेतकरी संघटना: एडवोकेट ज्ञानेश्वर शिरसाट, त्रिंबक भदगले, हरि आप्पा तुवर जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट कावळे भाऊसाहेब
शिवसेना: भाऊसाहेब वाघ, नेवासा तालुक्यातील आक्रमक नेतृत्व असणारे नितीन मिरपगार
सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे राजेंद्र भुजंग
तसेच सागर सांगोडे ,दत्तू पाटील निकम, प्रमोद जाधव, बापू सौदागर, सागर सांगळे, ओम तोडमल, डॉ. महेश कुंडारे, गणेश झगरे गरे, वकील संघटनेचे अनेक पदाधिकारी व वकील संघटन यांनी सक्रिय सहभाग घेतला अॅड. नहार, अॅड. धिरडे, अॅड. आर. आर. काळे व इतर अनेक कार्यकर्ते या उपोषणात सक्रिय सहभागी झाले होते.
नंतर प्रशासनाच्या वतीने सहाय्यक निबंधक घोडेचोर यांनी सहकार विभागाच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून खात्री दिली की नागेबाबा पतसंस्थेविरोधातील सर्व तक्रारी सहकार आयुक्त व निबंधक विभागाकडे सोपवून चौकशी लवकरच सुरू केली जाईल. तसेच शिवसेनेचे आक्रमक नेते भाऊसाहेब वाघ यांनी आमदार विठ्ठलराव लंघे, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे या प्रकरणात कडे लक्ष देणार असल्याचे सांगितले तसेच हे उपोषण तात्पुरते स्थगित करीत आहे सहाय्यक निबंधक घोडेचोर साहेबांच्या म्हणण्यानुसार जर चौकशी नाही झाली तर यापेक्षाही उग्र स्वरूपांनी आंदोलन होईल असे सुद्धा शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाघ यांनी ठणकावून सांगितले , त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार यांनी सुद्धा संबंधित बाब गंभीर असून या प्रकरणाची लवकरात लवकर तपास करण्याची मागणी केली त्यानंतर उपोषण करते शिवाय टेमक यांना लिंबू सरबत देऊन उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.
तरीही उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढील आंदोलन थेट नागेबाबा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर किंवा संस्थापकाच्या निवासस्थानी करण्यात येईल." सर्व संघटना आणि शेतकरी आता अधिक आक्रमक पावले उचलण्यासाठी सज्ज आहेत.
राजकीय दबाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आर्थिक शोषणाच्या विरोधात हा लढा तात्पुरता नाही, अंतिम न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, अशी भूमिका सर्व पक्ष आणि संघटनांनी घेतली आहे. तसेच या भ्रष्टाचाराचा मूळ उखडला जाणार का नाही असा प्रश्न जिल्ह्यांत व सहकार क्षेत्रात सध्या चर्चेचा विषय आहे