राज्यात आदर्श चिलेखनवाडी : 'रोड मॉडेल व्हिलेज अभियान' अंतर्गत ऐतिहासिक निर्णय शिवरस्ता मोजणी प्रारंभ :-श्री शरदराव पवळे



राज्यात आदर्श चिलेखनवाडी : 'रोड मॉडेल व्हिलेज अभियान' अंतर्गत ऐतिहासिक निर्णय शिवरस्ता मोजणी प्रारंभ :-श्री शरदराव पवळे


नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे ‘रोड मॉडेल व्हिलेज अभियान’ अंतर्गत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाअसून महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरद भाऊसाहेब पवळे यांचे मार्गदर्शनाखाली संकल्पनेतून चिलेखनवाडी हे गाव रोड मॉडेल व्हिलेज म्हणून नेवासा तालुक्यातील पहिले गाव राहील. असे सभेच्या अध्यक्षस्थानी राहून पवळे साहेब यांनी मत व्यक्त केले
नेवासा तालुका भूमिअभिलेखचे उपअधिक्षक श्री. संदीप गोसावी यांनी चिलेखनवाडी परिसरातील १३ महत्त्वाच्या शेतरस्त्यांच्या मोजणीचे आदेश दिले असून, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ पासून ही मोजणी अधिकृतरित्या प्रत्यक्ष सॅटॅलाइट रोव्हर मशीन आणून माणसं आणून मोजणी प्रारंभ सुरू केला आहे यामध्ये चिलेखनवाडी- अंतरवली- वडुले- भायगाव शिवारस्ता, चिलेखनवाडी-कुकाणा शिवारस्ता, चिलेखनवाडी-जेऊर देवसडे शिवारस्ता, चिलेखनवाडी गाव ते कुकाणा जुना रस्ता, चिलेखनवाडी-भायगाव जुना रस्ता, देवसडे रोड ते भायगाव रस्ता, चिलेखनवाडी-अडवणे वस्ती रस्ता, शेवगाव-नेवासा रोड पासून साहेबराव काटे वस्ती, विजय सावंत वस्ती, सोपान सावंत वस्ती, भातकुडगाव रस्ता, रमेश सावंत वस्ती आणि प्रभाकर खंडागळे वस्ती या रस्त्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या उपस्थित प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपअधिक्षक श्री. संदीप गोसावी यांनी मार्गदर्शन केले व प्रत्येकाला शासन निर्णयानुसार रस्ते मिळतील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही केले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शेतकी व पालन चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे यांनी रोड मॉडेल विलेज संकल्पना सविस्तरपणे शेत रस्ता समस्याग्रस्तांसमोर मांडली यासाठी सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे सुचविलेचिलेखनवाडीचे सरपंच श्री. भाऊसाहेब सावंत प्रास्ताविक केले व सविस्तर मार्गदर्शन केले

या या शिवमोजणी मोजणी अभियान प्रारंभ कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील यांची प्रमुख भूमिका असून, चळवळीचे नेवासा विभागातील सर्व सदस्य – श्री. सागर सोनटक्के सर, बाळासाहेब थोरात, राजेंद्र गरड विठ्ठल करमाड साहेबराव आखाडे, प्रशांत चौधरी संतोष शिंदे, सुजय शिंदे,चांगदेव शिंदे, सोमनाथ शिंदे 
अशोकराव मंडलिक, नाथाभाऊ गुंजाळ उपसरपंच मिनीनाथ घाडगे ईश्वर पाठक, काशीराम घाडगे कैलास दहिफळे सगाजी ऐणर अनिल सरोदे,वडूले ग्राम पंचायत सरपंच दिनकर गर्जे रमेश भक्त कारभारी गरड पत्रकार, कानिफनाथ कदम यांचेही सहकार्य लाभले आहे. मोजणी दरम्यान पंचायत समिती अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब काळे, ग्राम महसूल अधिकारी प्रियंका चव्हाण, नायब तहसीलदार श्री संदीप चिंतामणी साहेब यांनी प्रत्यक्ष भेट दिली तसेच महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीतील असंख्य शेतकरी उपस्थित होते या निर्णयामुळे चिलेखनवाडी गावातील शेतकरी वर्गाला मोठा आशावाद मिळाला असून, शेतीसाठी रस्ते उपलब्ध होत असल्याचे विकासाचे नवीन दालन खुले होणार आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.