वृक्षारोपण करू या, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या - सरपंच ललित मोटे पा.
वडाळा प्रतिनिधी संदीप वारकड.वडाळा बहिरोबा येथे बाजार तळ या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी वडाळा बहिरोबा गावचे सरपंच ललित पांडुरंग मोटे व ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे साहेब यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब मोटे सचिन मोटे निखिल मोटे प प्रतीक मोटे लक्ष्मण मोटे लहू तात्या मोटे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब दादा मोटे अर्जुन मोटे सुरेश मोटे विश्वनाथ घाडगे बाळासाहेब जामकर सुनील पतंगे श्रीकांत मोटे अमोल दारकुंडे सदाशिव मोटे विलास शेळके विलास कळसकर दादासाहेब मोटे संदीप मोटे अशोक मोटे माजी उपसरपंच विनोद पटेकर वाघमारे अंकल बॉबी गिरी तसेच रुरल हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय चे विद्यार्थी व शिक्षक गावातील महिला बचत गट अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी आदीजण उपस्थित होते. यावेळी ललित मोटे यांनी मनोगत व्यक्त केले ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला. शहरातील सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे वडाळा बहिरोबा परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती वा त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता.
यात सरकारने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. वृक्षारोपण करू या, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या त्यानंतर माजी उपसरपंच बाबासाहेब मोटे यांनी आभार मानले