‘कटूसत्य’ आत्मचरित्राचे श्रीक्षेत्र देवगड येथे भव्य प्रकाशन; ज्येष्ठ पत्रकार अड. बाळासाहेब तनपुरे यांचा गौरव




 ‘कटूसत्य’ आत्मचरित्राचे श्रीक्षेत्र देवगड येथे भव्य प्रकाशन; ज्येष्ठ पत्रकार अड. बाळासाहेब तनपुरे यांचा गौरव

श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथे आज ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब तनपुरे यांच्या ‘कटूसत्य’ या आत्मचरित्राचे भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज, नाशिक येथील प्रसिद्ध कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष आण्णा पाटील, हभप नंदकिशोर खरात महाराज यांच्या शुभहस्ते हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

नेवासे तालुका पत्रकारांच्या वतीने अ‍ॅड. बाळासाहेब तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे विशेष स्वागत आणि सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात (डावीकडून) सामनाचे तालुका प्रतिनिधी अशोकराव डहाळे, उद्योजक संभाजीराव कार्ले, सार्वमतचे तालुका प्रतिनिधी सुखदेव फुलारी, नवराष्ट्रचे प्रा. सुनील गर्जे, दिव्यमराठीचे गुरुप्रसाद देशपांडे, सकाळचे विनायक दरंदले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुबकपणे पार पडले असून, अ‍ॅड. बाळासाहेब तनपुरे यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, लढे, आणि सामाजिक जाणीवेचा परिपाक म्हणून हे आत्मचरित्र ‘कटूसत्य’ वाचकांसाठी एक मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.