सुदर्शन इंग्लिश स्कूल पिचडगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण जिल्हा परिषद सदस्य श्री. दिलीपराव सरोदे यांच्या हस्ते
पिचडगाव (प्रतिनिधी) – सुदर्शन इंग्लिश स्कूल, पिचडगाव येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण जिल्हा परिषद सदस्य श्री. दिलीपराव सरोदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय कोळेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष श्री. रामदास गोल्हार होते.
आपल्या मनोगतात श्री. सरोदे यांनी शाळेतील शिक्षकांनी गेली २५ वर्षे विनाअनुदान सेवा दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री यांच्या सहकार्यामुळे शाळेला अनुदान मंजूर झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली, कवायत सादर केली तसेच मनोगताद्वारे आपले विचार मांडले.
यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ. अंजना सोनवणे यांचा संस्थाध्यक्ष श्री. रामदास गोल्हार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. गोल्हार यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शाळेत लवकरच उच्चमाध्यमिक ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.
स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, मक्तापूरचे श्री. राजेंद्र गिर्हे महाराज यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली. माजी विद्यार्थी श्री. अशोक राठोड (अंबरनाथ) यांनी काही विद्यार्थ्यांना गणवेष वाटप केले, तर श्री. विष्णू चौघुळे यांनी खो-खो व कबड्डी संघासाठी टी-शर्ट दिले.
इ. १० वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. प्रणाली साळवे व कु. कादंबरी गवळी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पिचडगावचे माजी उपसरपंच श्री. संजय बनसोडे, पोलीस पाटील श्री. सुभाष शेजूळ, मराठा सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे यांनी म्हसळे–मक्तापूर रस्ता मुलांसाठी मंजूर केल्याबद्दल लोकप्रतिनिधींना धन्यवाद दिले.
कार्यक्रमास श्री. नवनाथ हजारे, सौ. अनिता हजारे, प्रदीप साळवे, शिवाजी बर्डे, शिवाजी शिरसाठ, रवि महागवे सर, श्रीमती प्रिया प्रभुणे मॅडम, श्री. कैलास कर्जुळे, श्री. दत्तात्रय कुळधरण, श्री. शकूर इनामदार, श्रीमती मनिषा जगताप, सौ. कल्पना गायकवाड, सौ. नंदा हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री. हनुमान गंधारे, कु. आराधना साळवे व कु. कल्याणी थोरात यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. गणेश कचरे यांनी केले.