"नेवासा फाटा व्यापाऱ्यांचा आरोप – जागतिक बँक अभियंता कार्यालयाचा सातत्याने त्रास, विकासाच्या नावाखाली व्यवसाय उद्ध्वस्त"
नेवासा फाटा, ११ जुलै २०२५ – अहिल्यानगर येथील जागतिक बँक अभियंता कार्यालयाकडून नेवासा फाटा परिसरातील व्यापाऱ्यांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे. महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली केवळ निवडक व्यावसायिकांना धाकधपटशा देणे, तोंडी सूचना देणे, आणि कोणत्याही लिखित आदेशाविना अतिक्रमण हटवण्याची जबरदस्ती करणे, हे रोजचेच चित्र बनले आहे.
> “आमच्याकडे ना नोटीस, ना कोणतं स्पष्ट आदेश... फक्त येऊन सांगतात की दुकान काढा. दुसरीकडे काही दुकाने तशीच आहेत. हे नियम सगळ्यांसाठी समान आहेत की निवडक लोकांवरच?”
– , स्थानिक व्यापारी.
> “दोन महिन्यांपूर्वीही असाच त्रास दिला गेला होता. त्यावेळीही आम्हाला कोणतीच मदत मिळाली नाही. आता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे. आम्ही रोज टेंशनमध्ये आहोत.”
– , फळ विक्रेता महिला उद्योजिका.
व्यापाऱ्यांनी असेही स्पष्ट केले की या कारवाईत पारदर्शकता नाही, ना कोणी ऐकून घेणारा आहे. काही निवडक व्यावसायिकांनाच लक्ष्य करून मानसिक त्रास दिला जात आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कोणतेही विस्थापन करताना योग्य पुनर्वसन, पूर्वसूचना व ऐक्य प्रक्रिया आवश्यक असते. मात्र येथे कोणताही संवाद न होता थेट दडपशाही केली जात आहे.
> “अभियंते येतात, कोणालाही काही सांगितलं जात नाही. एका भागात दुकानं दारांना बोलले जातात, तर दुसऱ्या भागात जणू काही अतिक्रमणच नाही. हा दुटप्पीपणा आम्हाला नको.”
– व्यवसायिक संघटनेचे पदाधिकारी.
व्यापाऱ्यांनी आता एकत्र येत संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच एक निवेदन जिल्हाधिकारी आणि जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिले जाणार असून, जर त्रास थांबवला नाही तर सामूहिक दुकान बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे व प्रशासकीय स्तरावर चौकशी करून आत्तापर्यंत रस्त्याचे किती कामे केली व अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर किती अपघात झाले या अपघातामध्ये अनेकांचा बळी गेला या अपघाताला रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तसेच अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे व काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग लाईट रिफ्लेक्टर स्टीकर तसेच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे जे रात्री दिसून येत नाही यामुळे अनेक अपघात होत आहे याला जबाबदार करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल करणार आहे व्यापारी संघटनेमध्ये काही सुजाण व्यापारीकांनी इशारा दिला आहे
सुजान व्यवसायिक "
आमच्या जागा या खरेदीच्या आहे तसेच आम्हाला महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत कोणताही मोबदला मिळालेला नाही आहे
“महामार्गाच्या नावाखाली आमचं रोजचं जीवन उद्ध्वस्त करू नका. आम्ही विरोधक नाही, पण आम्ही मूक बळीही राहणार नाही!”