नेवासा फाटा मुकिंदपुर परिसरात "समृद्धी सेल्स" या होलसेल स्टेशनरी दुकानाचे उत्साही उद्घाटन
नेवासा फाटा, मुकिंदपुर : स्थानिक व्यापारी व ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेवासा फाटा मुकिंदपुर परिसरात “समृद्धी सेल्स” या नवीन होलसेल स्टेशनरी दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
लहान मुलांची खेळणी, शालेय व ऑफिस स्टेशनरी, आणि विविध उपयुक्त वस्तूंचा समावेश असलेल्या या दुकानामुळे परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली दर्जेदार व भरपूर पर्याय उपलब्ध होणार आहेत.
हे होलसेल दुकान उद्योजक युसुफ शेख यांच्या कल्पक संकल्पनेतून साकार झाले आहे. व्यवसायिक दृष्टिकोन ठेवत, ग्राहकांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवण्याचा त्यांचा उद्देश असून, स्थानिक व्यापाऱ्यांसाठी देखील ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर काका गायके सह संजय सुखदान, प्रमोद मारकळी , सागर देशमुख, एडवोकेट सादिक शिलेदार , लोकनियुक्त सरपंच सतीश दादांनी निपुंगे ,विक्रम पवार, अब्बास बागवान, नगरसेवक अल्ताफ पठाण , कैलास करंडे, माजी तहसीलदार कांदे साहेब सह अनेक , स्थानिक नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होता. परिसरातील व्यापाऱ्यांनी या नव्या दुकानाचे स्वागत करत, यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.“समृद्धी सेल्स” हे दुकान लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास उद्योजक युसुफ शेख यांनी व्यक्त केला.