वादळामुळे वडाळा परिसरातील वीजपुरवठा खंडित – लाईट सकाळपर्यंत बंद
वडाळा, ता. नेवासा – 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळ व पाऊस वाऱ्यामुळे वडाळा नंबर 2 येथील मुख्य वीजवाहिनीचे (मेन लाईन) पोल कोसळले असून ताराही तुटलेल्या आहेत. यामुळे माळीचिंचोरा गावठाण फिडर व लाखेफळ फिडरवरील शेतीविज पुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे.
वडाळा सबस्टेशनमधून येणारी 11 केव्ही वीज पुरवठा देखील सकाळपर्यंत सुरू होणार नाही, अशी माहिती वायरमन अक्षय भारते यांनी दिली आहे.
तसेच, वादळामुळे परिसरातील अनेक भागांत वीज पोल व तारा तुटल्याची नोंद असून, गावठाण व शेती दोन्ही फिडरवरील वीज रात्रभर बंद राहणार आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.