नेवासा फाट्यावर चक्काजाम! शेतकऱ्यांचा संताप उसळला – 14 जूनला रणकंदन! लढ्याचे रणांगण नेवासा फाटा येथे!



नेवासा फाट्यावर चक्काजाम! शेतकऱ्यांचा संताप उसळला – 14 जूनला रणकंदन!

नेवासा, ता. 13 जून (प्रतिनिधी) –
शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि हक्काचा आवाज सरकारकडून सातत्याने दुर्लक्षित केला जात असताना, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरण्याच्या स्थितीत आला आहे. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबकराव भदगले यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता नेवासा फाटा येथे तीव्र चक्काजाम आंदोलन छेडले जाणार आहे.
शेतकऱ्यांचे कैवारी बच्चुभाऊ कडू सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणास बसले आहेत. मात्र अद्यापही "सरकार" नावाच्या पाषाणहृदयी व्यवस्थेला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न चिरडण्याचा डाव सुरु असताना, विविध पक्षांत विखुरलेला शेतकरी वर्ग आता झेंड्यांच्या पलीकडे जाऊन एकवटण्याच्या तयारीत आहे.

> “आता पुरे झाले! हे आंदोलन पक्षाचे नाही, आपल्या बापाच्या घामाची किंमत मागणाऱ्या शेतकऱ्यांचे आहे,”
असे आवाहन त्रिंबकराव भदगले यांनी पत्रकार परिषदेत केल

झोपलेल्या सरकारला झणझणीत चपराक देण्यासाठी...

शेतकऱ्यांचे प्रश्न ही राजकीय खेळी नव्हे, तर जिवंत माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. दिवसरात्र राबणाऱ्या, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा, यासाठी नेवासा फाट्यावर हा चक्काजाम होणार आहे.

यावेळी संपूर्ण तालुक्यातील शेतकरी एकवटून सरकारला धडा शिकवतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
यावेळेस मुख्य मागण्या :
संपूर्ण कर्जमाफी – कोणत्याही अटींशिवाय

वीजबिल माफी आणि नियमित वीजपुरवठा

विमा कंपन्यांचा लुटमारीचा बंदोबस्त

हमीभावावर त्वरित निर्णय

🟢 शेतकरी एकत्र आला, तर सत्ता थरथरते!

🟢 नेवासा फाटा, 14 जून – 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.