नेवासा तालुक्यात पोलिसांची तत्परता: महिलेला ९० हजार रुपये दोन तासांत परत मिळवून दिले – प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांचे कौतुक!



नेवासा तालुक्यात पोलिसांची तत्परता: महिलेला ९० हजार रुपये दोन तासांत परत मिळवून दिले – प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांचे कौतुक!

नेवासा (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील मक्तापूर रस्त्यावरील जी के मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या एका महिलेला तब्बल ९०,००० रुपयांची फसवणूक सहन करावी लागत होती. ती रक्कम एका पतसंस्थेमध्ये कष्टाने बचत करून  त्या महिलेने टाकली  होती. अनेक वेळा विनंती करूनही संबंधित संस्थेकडून पैसे परत मिळत नव्हते, आणि संबंधित महिला मानसिक त्रासात होती.

परंतु, परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सदर महिला थेट नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे यांची भेट घेण्यासाठी पोहचली. तिने आपली पूर्ण आपबिती सांगितल्यानंतर, संतोष खाडे यांनी प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आणि कायद्याचे विश्लेषण करत संबंधित पतसंस्थेला संपर्क केला.

फक्त दोन तासांत त्यांनी कायद्याची माहिती देत, कडक भूमिका घेत संस्थेला पैसे परत देण्यास भाग पाडले. अखेर, महिलेला तिचे संपूर्ण ९०,००० रुपये परत मिळाले, आणि तिने समाधान व्यक्त केले.

नेवासा तालुक्यात नागरिकांच्या अडचणींवर तातडीने निर्णय घेणारे, कायद्याची योग्य अंमलबजावणी करणारे व जनतेचा विश्वास जपणारे अधिकारी म्हणून संतोष खाडे यांचे नाव आता विशेष आदराने घेतले जात आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि धाडसी निर्णयामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची प्रशंसा केली जात आहे.

नेवासा तालुक्याला संतोष खाडे सारखे प्रामाणिक, पारदर्शक व जनतेसाठी काम करणारे अधिकारी लाभले याचा अभिमान वाटतो असे त्या महिलेने सांगितले आहे!



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.