पालखी सोहळ्याचा नव्या परंपरेला प्रारंभ : नेवासे ते पंढरपूर यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेवासा, (एकादशी विशेष बातमी) —सोनई प्रतिनिधी :- (भाऊसाहेब खेसमाळसकर)
"अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन" या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील शब्दांप्रमाणे संपूर्ण विश्वात सुख, समाधान आणि भक्तिभाव नांदावा या हेतूने, श्री क्षेत्र नेवासा येथून पंढरपूरकडे भव्य पालखी सोहळा निघत आहे. हा सोहळा ज्ञानेश्वरीच्या पवित्र रचनास्थानावरून पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पर्वणी ठरत आहे.
या अनोख्या सोहळ्याची संकल्पना व प्रेरणा हे वै. ह. भ. प. तुकारामजी पाटील गडाख यांचे दीर्घकाळाचे स्वप्न होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, गुरुवर्य ह. भ. प. देविदासजी महाराज म्हस्के (मठाधिपती, श्री क्षेत्र नेवासा), विठ्ठल आश्रम गंगापूर गाथा मूर्ती ह. भ. प. महादेवजी महाराज राऊत, व महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (देवगड संस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच तालुक्यातील सर्व भक्तांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा अखेर साकार होत आहे.
दिनांक २२ जून २०२५, आषाढी एकादशीच्या शुभदिनी, पंढरी पूल येथे या पालखीचे स्वागत सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. सकाळी ठीक ८:०० वाजता या ठिकाणी भाविक भक्तांना माऊलींच्या दर्शनाचा व फराळ प्रसादाचा लाभ मिळणार आहे. सर्व वारकरी बंधू-भगिनींना आणि श्रद्धावान भाविकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
आपला सेवक,
मा. रविराज तुकाराम पाटील गडाख
पसायदान प्रतिष्ठान, पानसवाडी
---