ऑपरेशन सिन्दूर" ची गरज – शेतकरी आत्महत्यांच्या विरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची मागणी त्रिंबक पाटील भदगलेअध्यक्ष, शेतकरी संघटना, नेवासा



---

 "ऑपरेशन सिन्दूर" ची गरज – शेतकरी आत्महत्यांच्या विरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची मागणी

नेवासा, प्रतिनिधी:
“भारतात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शेतकरी महिलांचे सिन्दुर (कुंकू) पुसले जात आहे. या शेतकरी लुटीच्या धोरणांविरुद्ध ‘ऑपरेशन सिन्दूर’ राबवून हे थांबवण्याची हिंमत सरकार का दाखवत नाही?” — असा जळजळीत सवाल शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष त्रिंबक पाटील भदगले यांनी उपस्थित केला आहे.

श्री. भदगले म्हणाले, की देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही केवळ एक आकडेवारी नाही, तर लाखो कुटुंबांचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य आहे. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत, याचा अर्थ दररोज 8 महिलांचे मंगळसूत्र हिरावले जात आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने आणि ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, केवळ कर्जमाफी किंवा तात्पुरते सवलती देऊन शेतकऱ्यांची स्थिती सुधारत नाही. कृषी उत्पन्नाला हमीभाव, सिंचनाची सोय, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तत्काळ मदत, वीज दर सवलत यांसारख्या मूलभूत धोरणांची गरज आहे. ‘ऑपरेशन सिन्दूर’ ही एक व्यापक मोहीम म्हणून सरकारने स्वीकारावी, जी शेतकरी आत्महत्यांना रोखण्यासाठी ठोस उपायांची अंमलबजावणी करेल.

श्री. त्रिंबक पाटील भदगले यांनी सरकारला थेट सवाल केला आहे – “शेतकऱ्यांचा जीव वाचवण्याइतकी हिंमत सरकारमध्ये आहे का?” त्यांनी सांगितले की, जर लवकरच शाश्वत उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत, तर शेतकरी संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल.

संपर्क:
त्रिंबक पाटील भदगले
अध्यक्ष, शेतकरी संघटना, नेवासा तालुका
मोबाईल: 9730620475



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.