स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पथसंचलन व शोभायात्रेचे आयोजन
नेवासा (प्रतिनिधी) – स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक १६ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता एक भव्य पथसंचलन व शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे शुभहस्ते महंत गुरुवर्य भास्करगिरिजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान) यांच्या पवित्र उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तेजश्रीताई विठ्ठलराव लंघे (मा. जिल्हा परिषद सदस्य) उपस्थित राहणार आहेत.
पथसंचलनाचा मार्ग: मळगंगा देवी मंदिरापासून सुरू होऊन खोलेश्वर गणपती मंदिरासमोरील प्रांगणात समारोप होईल.
या शोभायात्रेत विविध सांस्कृतिक व पारंपरिक दिंड्या, ढोल-ताशा पथक, लेझीम, वेशभूषा आणि शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण यांचा समावेश असून, स्थानिक नागरिकांसाठी हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.
स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानने यापूर्वीही अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले असून, यंदाचे हे आयोजन विशेष आकर्षण ठरणार आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.