पडळकरांच्या सभेत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर; मुख्यमंत्री फडणवीस संतप्त, कारवाईचे आदेश

पडळकरांच्या सभेत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर; मुख्यमंत्री फडणवीस संतप्त, कारवाईचे आदेश

पुणे | १५ मे २०२५ | प्रतिनिधी

नाशिकमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेदरम्यान कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदू विराट सभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पडळकर भाषण करत असताना काही युवकांनी बिश्नोईचा फोटो उंचावला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला असून तातडीने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. “गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण कदापि खपवून घेतले जाणार नाही. जे कोणी पोस्टर झळकवले, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, “मला स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मी त्यांना सर्व माहिती पोलिसांना सविस्तर देण्यास सांगितले आहे. आम्ही या प्रकरणात कठोर पावले उचलणार आहोत.”

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. “हे धक्कादायक असून सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या सभेत असे फलक झळकावले जाणे गंभीर बाब आहे. यामुळे पडळकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.