नेवासा तालुक्यातील विकास कामांसाठी आवाज बुलंद!
संजय भाऊ बनसोडेंची रामदास आठवलेंकडे ठाम मागणी
राहुरी (नगर) – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वेग राहुरी येथील दौर्यादरम्यान, नगर जिल्ह्याचे सरचिटणीस संजय भाऊ बनसोडे यांनी नेवासा तालुक्यातील रखडलेल्या विकास कामांसाठी ठाम भूमिका घेत आक्रमक मागणी केली. बौद्ध विहाराच्या उभारणीसह समाजहितासाठी असलेल्या विविध योजना आणि कामांची पूर्तता तत्काळ करावी, अशी स्पष्ट व ठोस मागणी त्यांनी केली.
बनसोडे यांनी मंत्री आठवले यांच्यासमोर नेवासा तालुक्यातील मागास भागात असलेल्या दुर्लक्षित वस्तींची परिस्थिती मांडताना, विकासकामांकडे सरकारचे दुर्लक्ष चालणार नाही, असा इशारा दिला. “बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांची उभारणी, शैक्षणिक सुविधा, आणि मुलभूत गरजांची पूर्तता ही केवळ मागणी नव्हे, तर हक्काची गोष्ट आहे,” असे ते म्हणाले.
मंत्री आठवले यांनी या मागण्यांकडे सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच संबंधित योजनांसाठी निधी आणि पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.
---