मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी निवड — प्रेस क्लब नेवासे कडून मनःपूर्वक अभिनंदन
नेवासे (प्रतिनिधी) – अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रेस क्लब नेवासे यांच्यावतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
श्री साईबाबा संस्थान हे देशातील एक प्रतिष्ठित व श्रद्धास्थानी संस्थान असून, अशा महत्वपूर्ण पदावर मा.ना. विखे पाटील यांची निवड होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे संस्थेच्या कार्यात पारदर्शकता, विकास आणि भाविकांसाठी सुविधा वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रेस क्लब नेवासेच्या वतीने मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली साई संस्थान नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.