:
संत मनोहर मामा यांचे शनिशिंगणापूर येथे आगमन; नव नियुक्त भाजप तालुकाध्यक्ष प्रतापभाऊ चिंधे यांचा सन्मान
शनिशिंगणापूर प्रतिनिधी.अखंड महाराष्ट्राच्या श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र महंत बाळूमामा यांच्या कार्याचे अनुकरण करणारे व त्यांचे निष्ठावान अनुयायी संत मनोहर मामा शनिशिंगणापूर येथे शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. त्यांनी आपल्या भक्त परिवारासह दर्शनाचा लाभ घेत भक्तांसमवेत धार्मिक वातावरण निर्मिती केली.
यावेळी नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्त झालेले प्रतापभाऊ चिंधे यांचा संत मनोहर मामा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संत मामा यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अविनाश बानकर, प्रकाश शेटे यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.