*नेवासा शहर काँग्रेसकडून भीम जयंती उत्साहात साजरी*
(नेवासा प्रतिनिधी)- नेवासा शहर काँग्रेसकडून मोठया उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे.आज नेवासा शहर काँग्रेसने देखील भीमजयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरानी डॉ बाबासाहेब यांच्या जीवनावर तसेच बाबासाहेबांच्या कार्यावर भाषणे केली.यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अंजुम पटेल बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत बाबासाहेबांच्या शिकवणीवर आपल्या देशातील तरुणांनी वाटचाल करत आपले ध्येय,उद्दिष्ट साध्य करावे. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी आज बाबासाहेबांनी येथील पीडित समाजास जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला त्यासाठी संविधान निर्माण केले पण आज काही जातीयवादी शक्तींनी आपल्या स्वार्थासाठी संविधान धोक्यात आणले आणि हे संविधान वाचविण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे.हे स्पष्ट करत यासाठी अपल्याला लढा द्यावा लागेल हे स्पष्ट केले. शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत आभार मानले. या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नवनाथ मारकळी, सरपंच प्रकाश सोनटक्के, बाळासाहेब मारकळी, मच्छिन्द्र हापसे, संजय वाघमारे, संजूबाबा गायकवाड,अभिषेक पटारे, मार्कस बोरडे, दीपक बोर्डे, दिलीप गायकवाड, सागर धोंगडे, संदेश बोर्डे, नंदेश बोर्डे, सूरज बोर्डे, आदीसह भीम सैनिक उपस्थित होते.