मुकिंदपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
नेवासा (प्रतिनिधी)मुकिंदपूर गावातील राजमुद्रा चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्यात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुकिंदपूरचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब निपुंगे, सभापती किशोरभाऊ जोजार, नंदू वाकडे,गणेशभाऊ निमसे, पोलीस पाटील आदेश साठे ,संजय वाघमारे, बाळासाहेब केदारे बबलू साळवे ,पप्पू इंगळे, सह स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक योगदानाचे स्मरण करत, त्यांचा आदर्श समाजात रुजवण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमात अभिवादन, विचारमंच आणि शुभेच्छा यांच्याद्वारे एकात्मतेचा संदेश देण्यात आला. "जय भीम, जय संविधान" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
---