युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी सर्व धर्मीय सलोखा जपत साजरा केला ईद ए मिलनकुकाणा येथे भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उत्साही कार्यक्रमाचे आयोजन


युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी सर्व धर्मीय सलोखा जपत साजरा केला ईद ए मिलन
कुकाणा येथे भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उत्साही कार्यक्रमाचे आयोजन

कुकाणा( प्रतिनिधी) दि. १४ एप्रिल – कुकाणा गावामध्ये युवा नेते अब्दुलभैय्या शेख आणि भैय्या सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व धर्मीय सलोखा जपत "ईद ए मिलन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध धर्मीय धर्मगुरूंना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला भेट देऊन करण्यात आली. यावेळी धर्मगुरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे अठरा पगड जाती, बारा बलुतेदार आणि सर्व धर्मियांना बरोबर घेऊन स्वराज्य उभं केलं, त्याच मार्गाने आजही सामाजिक सलोखा राखण्याचे महत्व अधोरेखित केले.

यावेळी उपस्थित धर्मगुरूंमध्ये ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, उगले महाराज, काळे महाराज, पाटेकर महाराज, पास्टर यहोशवा मोहिते, मौलाना इम्रान, मौलाना शमशाद, मौलाना सद्दाम पटेल यांनी आपली मनोगते व्यक्त करत सामाजिक एकतेचे महत्व विशद केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार पांडुरंग अभंग, किसनराव (पेशवे) गडाख, ॲड. हिम्मतसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे, सरपंच लताताई अभंग, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष संतोषजी पवार, अनिलराव माकोने, विलासराव देशमुख, अमोलभाऊ अभंग, अशोकशेठ चौधरी, वसंतराव कांगुणे, संदीप लष्करे, राजूभाऊ बागडे, अनिल गर्जे, नजीम सय्यद, शकुर सर, समीर सर, इस्माईल सर, जावेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भैय्या सामाजिक प्रतिष्ठानचे इम्तियाज शेख, अभिराज आरगडे, स्वप्नील कचरे, अशपाक इनामदार, सूरज पवार, रेहान शेख, प्रतीक बडे, प्रज्वल साबळे आणि इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

या सर्व धर्मीय ईद ए मिलन कार्यक्रमाबद्दल गावात आणि परिसरात सर्वत्र कौतुकाचे सूर ऐकायला मिळत असून, अब्दुलभैय्या शेख आणि त्यांच्या टीमने सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला आहे.


---



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.