डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती वडाळा ग्रामपंचायतीत साजरी
.
वडाळा, ता. [तालुका], दि. १४ एप्रिल: वडाळा ग्रामपंचायतीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच ललित पाडुरंग मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपसरपंच रंजना सुरेश राऊत, तसेच ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब मोटे, निखिल मोटे, सचिन मोटे, बाळासाहेब जामकर, अशोक कांबळे, ऍड. नानासाहेब मोटे, संतोष तेलतुंबडे, सागर तेलतुंबडे, भाऊराव शिंदे, विठ्ठल पवार, लहु मोटे, लक्ष्मण मोटे, बाबी गिरी, अतिष गायकवाड, सुनिल पतंगे यांची उपस्थिती होती.
डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे भाषण करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी विशाल मोटे व मनोहर लवांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
गावातील नागरिकांनीही कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा समारोप भारत माता की जय आणि जय भीमच्या घोषणांनी करण्यात आला.