डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धा
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये चुरशीचा सामना रंगला. यामध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. या विजेत्या संघासाठी मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी मक्तापूर ग्रा.पं. कार्यालयासमोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अनिल लहारे व माजी उपसरपंच देवदान साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. महामानव डॉ. आंबेडकर यांच्या चौकाचे काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमासाठी गावातील महिला भगिनी आणि भीमसैनिकांनी मोठे सहकार्य केले.
या कार्यक्रमास माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, दत्तात्रेय कांगुणे, नरेंद्र साळवे, वंचितचे उपाध्यक्ष योगेश गायकवाड, अनिल लहारे, सनी साळवे, रितेश साळवे, मनोज झगरे, सचिन गायकवाड, उपसरपंच अविनाश साळवे, दावीद साळवे, प्रदिप साळवे, अविनाश हिवाळे, जॉईल साळवे, ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे, अशोक सोनवणे, भाऊराव साळवे, बबलू साळवे, अशोक साळवे, तन्मय पांडागळे, सुनील साळवे आदी उपस्थित होते. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.