*लोकसहभागातून बदलले धामोरी येथील प्राथमिक शाळेचे रुपडे*...
......चौकट.
धामोरीकराच्या या कार्याचे समाजातून कौतुक...
नेवासा प्रतिनिधी.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थान जवळील प्रवरा नदीकाठी सुंदर वसलेले छोटेसे आध्यात्मिक विचारधाराचे धामोरी हे गाव. जायकवाडी धरणा मधील पुनर्वशीत झालेले धामोरी हे गाव असून गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचे रूप बदलले आहे. विद्यार्थ्याला आवश्यक ज्ञान व माहितीचे भिंतीवर विविध प्रकारचे आकर्षक चित्रे व थोर महात्मे,राजे महाराजे, फळे ,फुले, प्राणी,या व अभ्यास विषय माहिती, सुविचार, सामान्य ज्ञानावर आधारित चित्रे ,श्लोक, व विद्यार्थी चांगल्या संस्कारात्मक देणारा संदेश याचे चित्रीकरण रंग रंगोटी व विविध मिक्सिंग कलर व डिझाईनच्या माध्यमातून कलात्मक चित्रीकरण माध्यमातून धामोरी येथील जिल्हा परिषदेत शाळेच्या भिंतीवर लोकवर्गणीतून करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक परिसर स्वच्छता आणि आनंदाचे वातावरण व सुंदर परिसर निर्मिती करण्याचा ग्रामस्थांकडून छोटासा प्रयत्न करण्यात आला, त्याचबरोबर ग्रामस्थांकडून शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून सर्व विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी नवीन बेंच व इंटरॅक्टिव्ह बोर्ड (डिजिटल फळा) उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज पटसंख्या 100% हजेरी लागत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून समाजातून कौतुक होत आहे.शाळेच्या रंगकामासाठी विशेष सहकार्य माजी सरपंच कैलास पटारे, चेअरमन नवनाथ पटारे, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ पटारे, कामगार पोलीस पाटील दिलीप पटारे, यादव पटारे, नंदू जमधडे,विठ्ठल पटारे,संतोष पटारे ,संतोष जैन, सचिन वरखडे रामकिसन नांगरे, गणेश पटारे, सयाजी दाने, झुंबर दाणे, संदीप पटारे, किरण निपुंगे, राम पटारे, विठ्ठल वरखडे, गणेश सोलट, सुनील हेलवाडे,विलास पटारे, दत्ता दाणे,किशोर घोरपडे, दत्ता पटारे,बापू हेलवडे,शंकर पटारे या सर्व देणगीदार ग्रामस्थांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हळगांवकर सीमा सूर्यकांत व त्यांचे सहकारी शिक्षक श्री राहिंज नवनाथ बबन ग्रामस्थांचे विशेष आभार मानले.