ईद ए मिलन स्नेहमेळाव्यात सर्वधर्मीय सद्भावनेचा संदेश – कुकाण्यात अब्दुलभैय्या शेख मित्रपरिवाराचा उपक्रम"


"ईद ए मिलन स्नेहमेळाव्यात सर्वधर्मीय सद्भावनेचा संदेश – कुकाण्यात अब्दुलभैय्या शेख मित्रपरिवाराचा उपक्रम"

कुकाणा, ता. १३ एप्रिल | प्रतिनिधी
सामाजिक ऐक्य, प्रेम, सौहार्द आणि विविध धर्मीय नागरिकांमध्ये स्नेहाचा सेतू मजबूत करण्याच्या हेतूने ईद ए मिलन स्नेहमेळाव्याचे आयोजन कुकाणा येथे रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले.

अब्दुलभैय्या शेख मित्र परिवाराच्या पुढाकाराने आयोजित हा स्नेहमेळावा सायंकाळी ६ वाजल्यापासून ‘आपल्या आगमनापर्यंत’ असे प्रेमळ आमंत्रण देत, एकतेचा सुगंध दरवळवत पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे स्थळ अब्दुलभैय्या शेख संपर्क कार्यालयाशेजारी, तरवडी रोड, कुकाणा असे असून, परिसरातील सर्वधर्मीय गुरु, मान्यवर नागरिक आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून आपल्या विचारांनी वातावरण मंगलमय करणार आहेत.

ईद हा सण आनंदाचा, एकोप्याचा आणि माणुसकीचा संदेश देणारा असतो. त्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यात सर्व धर्मियांच्या एकत्रित सहभागातून सामाजिक ऐक्य, सलोखा व सद्भावना यांचा आदर्श निर्माण होणार आहे.

"आपण आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी," अशी नम्र विनंती निमंत्रक अब्दुलभैय्या शेख मित्रपरिवाराने केली आहे.


---



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.