भाजप सदस्य नोंदणी अभियानाची नेवासा शहर येथे उत्साहात शुभारंभ*


*भाजप सदस्य नोंदणी अभियानाची नेवासा शहर येथे उत्साहात शुभारंभ*

नेवासा प्रतिनिधी::नेवासा शहर येथे माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष माननीय श्री नितीन भाऊ दिनकर यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ नेवासा तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे व भाजप जिल्हा सचिव प्रताप चिंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ भाजपचे नेते अनिल ताके,रामचंद्र खंडाळे सर, नगरसेवक सुनील जी वाघ, डॉ.लक्ष्मण खंडाले,सुरेश नळकांडे,गोटिराम मापारी,लक्ष्मण दाणे,विलास बोरुडे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव अमृता ताई नळकांडे वैद्यकीय आघाडी च्या महिला प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मनीषा वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व भारतीय जनता पार्टी नेवासा शहर व तालुक्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होईल यासंदर्भात उपस्थित त्यांना संबंधित केले याप्रसंगी बोलताना युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी सांगितले की प्रदेश कार्यालयाचे आदेशाने आपण भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या वाढवण्यासाठी तालुका वर अतोनात प्रयत्न करत आहोत सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्याला भारतीय जनता पार्टी पक्ष नेवासा तालुक्यात मजबूत करायचा असल्याने व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत व जिल्हा परिषद पंचायत समिती वर आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी सर्व शक्य होईल तेवढे प्रयत्न करणार , व सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय सर्व बुधवार स्वतः उपस्थित राहून भाजप सदस्य नोंदणी अभियान पुढील काही दिवसात करणारअसल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले, यानंतर भाजप जिल्हा सचिव प्रताप चिंधे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले की सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व खंबीरपणे उभे राहून इथून पुढे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष कसा मजबूत होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात येईल त्याप्रसंगी युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यात आले त्यामध्ये सचिन काळे राजू खंडागळे बापू जामदार करण पल्लारे यावा असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत आज सदस्य नोंदणी अभियाना प्रसंगी कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व मंडळींचे भारतीय जनता पार्टी तालुका व शहर यांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमादरम्यान नेवासा तालुक्यातील पत्रकारांमध्ये कोहिनूर असणारे सर्वांचे लाडके सुधीर भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचे नियोजन व शुभारंभ कार्यक्रम आयोजक नेवासा शहर भारतीय जनता पार्टी व व्यापारी असोसिएशन यांचे आभार मानले. सदस्य नोंदणी अभियाना च्या शुभारंभ प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पवार युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे, शहर उपाध्यक्ष शंकर कनगरे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष स्वार्थीक भोसले,व्यापारी सेलचे अध्यक्ष राजेंद्र मुथा, नगरसेवक सुनील वाघ, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष नानासाहेब शेंडे, भाजपचे प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे,संजय भंडारी, श्रीपाद बडवेअशोक ताके , देविदास साळुंखे,महेश लोखंडे,विवेक ननवरे, सचिन भांड, प्रतीक शेजुळं, बाळासाहेब शिरसागर, रुपेश उपाध्ये,अनिल परदेशी, संतोष चांदणे,नचिकेत कुलकर्णी, श्रीकांत नळकांडे,किशोर गारुळे,राजू संगपाल, नानासाहेब डौले डॉ.निलेश लोखंडे, कृष्णा डहाळे गोरक्षनाथ बेहले ,महिला आघाडीच्या डॉ. निर्मला सांगळे, भारती बेद्रे, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यानंतर नेवासा शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष रोहित पवार यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कार्यक्रमाच्या शेवटी माजी सरपंच सतीश गायके यांनी उपस्थितांचे आभार मानले
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.