खेडले परमानंद येथील अंगणवाडी छताचा भाग कोसळला. सुदैवाने जिवीत हानी टळली..

खेडले परमानंद येथील अंगणवाडी छताचा भाग कोसळला. सुदैवाने जिवीत हानी टळली.. 

नेवासा  (प्रतिनिधी) -- नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील गावठाण हद्दीतील असणाऱ्या अंगणवाडीतील खोलीच्या छताचा काही भाग कोसळला असल्याची घटना घडली आहे. दि.९ रोजी नेहमी प्रमाणे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडून गेले. थंडीचे दिवस असल्याने मुले बाहेर अंगणात बसला होते ज्ञान. अचानक आत मध्ये काही तरी पडल्याचा मोठा आवाज झाला. अंगणवाडी सेविकेने आत मध्ये डोकावून बघितले तर समोरचे द्रुश्य बघून क्षणभर पायाखालची जमीनच सरकली . इमारतीच्या छतावरील काही भाग कोसळला होता. सन.२०११ साली या इमारतीचे काम झाले होते . छतावरील काम तत्कालीन संबंधित ठेकेदारांने अपुर्ण अवस्थेत आजपर्यंत ठेवले होते. वरील बाजूस काम करण्यासाठी वाळू साठवून ठेवलेली होती. त्यामुळे पाणी साचून वरील छत ढिसाळ झाले.आधीच कामाचा दर्जा निक्रुष्ठ यामुळे अक्षरशः या चिमुल्यांसाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.त्यामुळे विद्यार्थी मरता- मरता वाचले आहे.
गेल्या तीन वर्षापासून छतावर पाणि साचते दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती साठी काम सुरू झाले होते पण बंद का पडल हे मात्र गुपीत आहे. एवढे होऊन सुध्दा कुणाला त्याचे सोयरसुतक नाही. तत्कालीन ठेकेदार कोण होता , तसेच त्याने हे काम अपुर्ण अवस्थेत का ठेवले त्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करु नये असा प्रश्न भेडसावत आहे. तालुका अंगडवाडी निरीक्षक झोपेत आहे का ?असाही प्रश्न उपस्थित होत आहे
            येणारा निधी कुठे वापरला गेला काम झाले कि नाही याची पाहाणी झाली नाही का ? 
      संबंधित घटनेला न्याय मिळेल का?..
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.