*भेंडा बु गण गण स्तरावर कार्यशाळा संपन्न*
भेंडा - ( प्रतिनिधी ) भेंडा बु ॥ ग्रामपंचायत सभागृहामध्ये दि १० डिसेंबर रोजी गण स्तरावर भेंडा बु , भेंडा खुर्द, सौंदाळा, देवगाव, दिघी, नजिक चिंचोली, शहापूर आदी गावांचे
सरपंच, ग्रामसेवक,ग्रा सदस्य, स्वयं साह्यता बचत गटाचे प्रतिनिधी आदींना या कार्य शाळेत मार्गदर्शन करण्यात आले .
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य सन २०२ ५ - २६ अंतर्गत आमच गाव आमचा विकास आराखडे तयार करण्यासाठी दि १० डिसेंबर रोजी भेंडा बु येथे एक दिवशीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्य शाळे स प्रभारी अधिकारी म्हणून नेवासा पं स चे विस्तार अधिकारी - संतोष कदम यांनी मार्गदर्शन केले यामध्ये सन 2025 - 26 चा विकास आराखडा तयार करणेसाठी बंधीत व अबंधीत निधी व घ्यावया ची कामे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून नऊ थिम व सतरा शाश्वत विकासाचे ध्येय या संदर्भात योग्य मार्गदर्शन केले . यावेळी व्यासपिठावर गणेशराव गव्हाणे,भेंडा बु चे सरपंच - सौ रोहिणी नामदेव निकम, उपसरपंच - सौ संगिता नामदेव शिंदे, देवगावच्या सरपंच सौ कांताताई तागड, भेंडा सोसायटीचे माजी अध्यक्ष - नामदेव निकम, माजी उपसरपंच - पंढरीनाथ फुलारी, येडुभाऊ सोनावणे, देवेंद्र काळे, मेजर विजय काळे, ग्रामसेवक - रेवन्नाथ भिसे, नरसाळे भाऊसाहेब, घाणमोडे भाऊसाहेब, नजन भाऊसाहेब बचत गटाच्या प्रतिनिधी - कांचन सावंत, सर्व अंगणवाडी सेविका, विष्णु फुलारी, बाबासाहेब गोर्डे, रामभाऊ देशमुख
आदी उपस्थित होते .