राजेंद्र वाघमारे यांना दैनिक प्रभात परिवर्तन सन्मान – उत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून गौरव
नगर: दैनिक प्रभातचे महागुरु आणि समूह व्यवस्थापक आद. बी. एल. स्वामी सर, वित्त व्यवस्थापक रविकुमार इंडी सर, जाहिरात व्यवस्थापक प्रविणजी पारखी सर, अ.नगर विभागाचे जयंत कुलकर्णी आणि जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी यांचा आज नगर येथील बैठकीत उपस्थिती होती. यावेळी, राजेंद्र वाघमारे यांना 'दैनिक प्रभात परिवर्तन सन्मान' म्हणून 'उत्कृष्ट प्रतिनिधी' म्हणून गौरविण्यात आले.
या सन्मानानंतर राजेंद्र वाघमारे यांनी त्यांच्या लेखनासाठी मिळालेल्या सन्मानाचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "दैनिक प्रभात परिवाराच्या या सन्मानामुळे माझ्या लेखनाला नवा उत्साह मिळाला आहे. माझी लेखनी सदैव परखड आणि प्रामाणिक राहील."
दैनिक प्रभात परिवाराचा हा सन्मान राजेंद्र वाघमारे यांच्या कर्तृत्वाचे आणि त्यांच्या लेखनाचे जणू एक आदर्श उदाहरण आहे.