*स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती नेवाशात विविध उपक्रमाने साजरी*
नेवासा प्रतिनिधी
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत भानसहिवरे येथीलसंत गाडगे बाबा आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले. भानसहिवरे येथील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या पुढाकारातून हा विधायक उपक्रम करण्यात आला.नेवाशाचे नायब तहसीलदार किशोर सानप यावेळी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी पोपट शेकडे राजेंद्र कीर्तने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.नायब तहसीलदार सानप, सुनील लंघे भाजपा युवा मोर्चाचे प्रताप चिंधे, वडूले सरपंच दिनकर गर्जे, अनिल गर्जे,राजेंद्र कीर्तने,बाबासाहेब गोल्हार, डॉ निर्मला सांगळे आदींच्या हस्ते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नायब तहसीलदार सानप, लंघे, गर्जे, विष्णू सांगळे महाराज यांची स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची माहिती भाषणातून सांगितली.लोकनेते मुंडे व आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यातील गुरु शिष्याच्या प्रेमातून आमदार लंघे यांनी स्व मुंडे यांचा हात धरून संघर्ष करत तत्कालीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती याची आठवण े यावेळी प्रताप चिंधे व दिनकर गर्जे यांनी भाषणातूनसांगत स्व मुंडे व आमदार लंघे यांच्यातीलनिकटच्या संबंधाची माहिती सांगितली.पोपट शेकडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.भानसहिवरे सरपंच किशोर जोजार,मंडळाधिकारी सरिता मुंडे, लक्षण मोहिटे, शेतकरी संघटनेचे नाबदे,मानव साळवे, आकाश सानप, विशाल नजन,संत गाडगे बाबा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नितीन कांबळे, सहशिक्षक रमेश डोळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.