**नेवासा तहसील मध्ये शेत व शिव रस्ता जनन्याय
. दिन कार्यवाही सुरु
शिवपानंद रस्ता कार्यकर्त्यांसह शेतरस्ते समस्याग्रस्त
. शेतकरी सहभागी
******------------******------------
नेवासा तहसील कार्यालय मध्ये आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी शेत व शिव रस्त्या प्रश्नासाठी व समस्या सोडवण्यासाठी जनन्याय दिन कार्यक्रम घेतला जात असून गुरुवार दिनांक पाच डिसेंबर 2024 रोजी शेत शिव पानंद रस्ता जनन्याय दिन कार्यक्रमात नायब तहसीलदार श्री चांगदेव बोरुडे व श्री कुलकर्णी श्री उमाप या अधिकाऱ्यांनी शिव - पाणंद शेत रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर उपस्थित रस्ता ग्रस्त शेतकऱ्याच्या समस्यावर सविस्तर चर्चा करून शेत रस्ता समस्या निवारणासाठी पुढील कार्यवाही करीत असल्याचा मनोदय व्यक्त केला त्यामुळे शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीच्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीच्या माध्यमातून चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे व समन्वय श्री दादासाहेब जंगले यांचे मार्गदर्शनाने नेवासा तहसील येथे गुरुवार हा जनन्यायदिन पाळण्याचे तहसीलदार श्री संजय बिरादार यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केले होते त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा नंतर आलेल्या गुरुवारी जनन्याय दिन घेण्यात येईल असे तहसीलदार यांनी सुचविले होते त्यानुसार
शेत रस्ते शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात दर गुरुवारी न्याय दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .या जन न्याय दिनास ५ डिसेंबर20 24 रोजी तहसिल कार्यालयातील श्री चांगदेव बोरुडे नायब तहसीलदार व अव्वल कारकून श्री कुलकर्णी व उमाप लिपिक यांनी शेत रस्ता प्रकरणे हाताळली . त्यामुळे तालुक्यातील उपस्थित असणाऱ्या ५० -६० समस्याग्रस्त शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी