तेलकुडगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
तेलकुडगाव (प्रतिनिधी,) : महामानव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तेलकुडगाव ग्रामसचिवालयासमोर अभिवादन अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमात भीमशक्ती युवा प्रतिष्ठान, तेलकुडगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी सहभागी होऊन डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला सन्मान दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभात तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्री. सतीशराव काळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. या प्रसंगी शरद काळे, अशोक काळे, साईनाथ काळे, कानिफनाथ घोडेचोर, मालोजीराव गटकळ, अरुण पाटील घाडगे, काकासाहेब काळे, महायुतीचे कार्यकर्ते संजय घोडेचोर, राजेन्द्र पेत्रस, वंचितचे पोपटराव सरोदे, उबाठा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, गोरक्षनाथ काळे, म्हतारदेव काळे, अशोक शेटे, दादा म्हस्के, तसेच भीमशक्ती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश तेलधुने, उपाध्यक्ष राजेन्द्र साळवे, शरद मिसाळ, लतेश साळवे, भागचंद साळवे, संतोष साळवे, सोपान तेलधुने, दीपक शिरसाठ, अजय तेलधुने, आदित्य तेलधुने, भाऊसाहेब साळवे, प्रतिक साळवे, निलेश साळवे, सागर सरोदे, विशाल सोनवणे, संदेश चक्रनारायण, आदर्श बनकर, आकाश मिसाळ, संतोष तेलधुने, ज्ञानेश्वर तेलधुने आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या विचारधारेच्या प्रसारासाठी सर्वांना एकजूट होऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे तेलकुडगावमध्ये डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली, तसेच त्यांच्या कार्याचे स्मरण करून समाजातील समानतेची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.