आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोनईत अभिवादन
सोनई, दि. ६ (वार्ताहर) - सोनईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी व पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास सोनई ग्रामपंचायतीचे सदस्य जमशेद सय्यद, अंबादास राऊत, किशोर वैरागर, भानुदास कुसळकर, संतोष साळवे, सनी साळवे, राजेंद्र दोंडे, रमेश पवार, निळकंठ काकडे, उदय कर्डक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष व समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजुभाऊ जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी जालिंदर येळवंडे, प्रा. रौंदळ, राजेंद्र निंबाळकर, युवानेते प्रकाश शेट, संतोष तेलोरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर वैरागर, आकाश काकडे, राहुल वैरागर, विशाल जगताप, सुनील पाडळे, जेकब साळवे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.