आमदार विठ्ठल लंघे यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे दत्त जयंती उत्सव साजरा
देवगड : श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे दत्त जयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल लंघे पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेत भगवान दत्तात्रयाचे व परमपूज्य गुरुवर्य बाबाजींचे पूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी दत्तजन्मोत्सवानिमित्त तालुक्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ काळे, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, राजु काका मते, सतीश कर्डिले आणि तालुक्यातून आलेले असंख्य भक्तगण उपस्थित होते.
दत्त जन्मोत्सवाच्या या पवित्र प्रसंगी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसात न्हालले, आणि उत्सवाचे आयोजन अत्यंत उत्साही पद्धतीने पार पडले.