लष्करे यांची नेवासा शहर संयोजक पदावर नियुक्ती
नेवासा (प्रतिनिधी)नारायणगिरी महाराज आश्रम बाभळेश्वर येथे आयोजित जिल्हा बैठक संपन्न झाली. आगामी काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संघटना मजबूत करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील नवीन पदाधिकार्यांना जबाबदारी देण्यात आली.
बैठकीस विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री सतीश गोर्डे, विभाग मंत्री सुनिल खिस्ती, जिल्हामंत्री विशाल वाकचौरे, जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, जिल्हा निधी प्रमुख प्रशांत बहिरट आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विकास लष्करे यांची नेवासा शहर संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सहमंत्री सतीश गोर्डे यांनी लष्करे यांची निवड केली आणि त्यांना आगामी कार्यवाहीसाठी मार्गदर्शन केले.
बैठकीत संघटनात्मक दृष्टीकोनातून चर्चा झाली, तसेच आगामी काळात संघटनेच्या कार्यवृद्धीसाठी विविध निर्णय घेण्यात आले.