परभणी येथील संविधान प्रतिमेची मोडतोड आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायाची मागणी
नेवासा, (प्रतिनिधी)16 डिसेंबर 2024:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या तालुका अध्यक्ष श्री. सुशिलभाऊ धायजे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा येथे एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये परभणी येथील संविधान प्रतिमेची मोडतोड करणाऱ्या समाज कंटकास व इतर गुन्हेगारास देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करून तसेच पोलीस कस्टडी मध्ये मृत्यू पावलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनामध्ये सूचित करण्यात आले आहे की, काही दिवसांपूर्वी परभणी येथील संविधान प्रतिमेच्या अवमान प्रकरणानंतर झालेल्या निषेध आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या काळात आंदोलनात नसलेला कायद्याचा विद्यार्थी असलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या कोठडीत मृत्यूमुखी पडला. या प्रकरणाची सखोल आणि न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नेवासा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस मारहाणीच्या आरोपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, त्यांना तत्काळ नोकरीतून बरखास्त करावे आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारकडून सांत्वनपर आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.
या निवेदनावरती
सुशिलभाऊ धायजे (आर.पी.आय. तालुका अध्यक्ष, नेवासा)संजयभाऊ बनसोडे (आर.पी.आय. जिल्हा सरचिटणीस)पप्पू इंगळे (नेवासा शहराध्यक्ष)नितीनभाऊ भालेराव (तालुका कार्याध्यक्ष) स्वनिल सोनकांबळे संतोष वडागळे संतोष मोरे निखिल साठे , निलेश शेंडगे
अमोल घुले (ग्रां.प. सदस्य, मुकिंदपूर)श्री. शांतवन खंडागळे (जिल्हा कार्याध्यक्ष, भारतीय लहूजी सेना) आदींच्या सह्या या निवेदनावर आहे. या निवेदनामुळे या गंभीर प्रकरणावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. त्यांनी सरकारकडून या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.