लक्ष्मी माता मंदिर तेलकुडगाव - प्राणप्रतिष्ठा समारंभ
नेवासा ( प्रतिनिधी)लक्ष्मी नगर येथील लक्ष्मी माता मंदिर मध्ये लक्ष्मी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त विशेष धार्मिक सोहळा संपन्न झाला. या समारंभात सोमेश्वर महाराज गवळी यांच्या किर्तन सेवेसह, महंत सुनीलगीरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
कार्यक्रमात नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पत्नी रत्नामाला ताई विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच, ह.प.भ. अमोल महाराज घाडगे, देवस्थान अध्यक्ष सोपान घाडगे, उपाध्यक्ष रविद्र घाडगे, महेश महाराज घाडगे, रामचंद्र घाडगे, गणेश घाडगे, सतिष काळे, शरद काळे, श्रीकांत घाडगे, सुनील शेटे, युवा नेते अर्जुन कर्डिले, तेजस घाडगे, देवा शैलेश गुंपेकर, धोंडीराम बाबा घाडगे, संजय घाडगे, रामेश्वर शेटे, किरण शेटे, ज्ञानेश्वर शेटे, सागर घाडगे, सचिन घाडगे, आदित्य घाडगे, युवा कीर्तनकार आरुष महाराज घाडगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच, लक्ष्मी माता भक्त मंडळ आणि सर्व भाविक मंडळांच्या मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या आशीर्वादाने कार्यक्रमाची शोभा वाढवाली