नेवासामधील ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. अरुण घनवट यांची नियुक्ती


नेवासामधील ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. अरुण घनवट यांची नियुक्ती
नेवासा (प्रतिनिधी):

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे उपप्राचार्य पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे डॉ. अरुण घनवट यांची संस्थेने प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे. गणित विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. घनवट हे ३२ वर्षांपासून अध्यापन व प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी २००८ मध्ये एम. फिल. पदवी प्राप्त केली आहे.

नवीन पदभार सोपवतानाचा कार्यक्रम संस्थेचे सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. घनवट यांनी सर्व सेवकांचा सहयोग घेत महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख अधिक उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याला अधिक बळ मिळेल, अशी भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.