उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनईत तांत्रिक शिक्षणाचा नवा अध्याय


उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनईत तांत्रिक शिक्षणाचा नवा अध्याय

नेवासा, ता. ६ जून – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला असून, संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या पुढाकारामुळे सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेला २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना AICTE (नवी दिल्ली) व महाराष्ट्र शासन यांची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.

या नव्या मान्यतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खालील अभ्यासक्रम शिकण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे:

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी


उदयन गडाख यांनी सांगितले की, "पॉलिटेक्निक शिक्षण हा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. १० वी नंतर थेट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यास ११ वी व १२ वीचा कालावधी वाचतो आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेशिवाय (CET/JEE) इंजिनिअरिंगमध्ये प्रगती करण्याचा मार्ग खुला होतो."

पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण केल्यावर विद्यार्थी IT क्षेत्रात नोकरीस पात्र ठरतात किंवा थेट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवू शकतात. कमी गुणांमुळे इंजिनिअरिंगसाठी पात्र ठरणारे अनेक विद्यार्थी आता या नव्या संधीचा लाभ घेऊ शकतात.

यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहिलेल्या या संस्थेत अनुभवी शिक्षकवृंद, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शासकीय नियमांनुसार सर्व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तर मुलींना मोफत शिक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक क्रांतिकारी संधी असून, उदयन गडाख यांच्या दूरदृष्टीतून सोनईत तांत्रिक शिक्षणाचा भक्कम पाया घालण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.