*गोंडेगाव च्या उपसरपंचाचे सदस्य पद रद्द*
नेवासा (प्रतिनिधी )नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील उपसरपंच संतराम खंडू रोडगे यांना सरकारी जागेवरील अतिक्रमण भवले आहे. संतराम खंडू रोडगे हे 2021 ते 2025 या कालावधीसाठी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन मधून इतर मागास प्रवर्ग या राखीव जागेमधून सदस्य म्हणून निवडून आले होते. परंतु रोडगे यांनी शासकीय गट नंबर 46 मध्ये अतिक्रमण करून 14 बाय 39 वेट सिमेंट पत्र्याचे पक्की बांधकाम केले आहे. ग्रामपंचायत नमुना आठ ला मालक सदरी ग्रामपंचायत गोंडेगाव तसेच भोगवटाधार संतराम खंडू रोडगे असे नमूद आहे याबाबत काशिनाथ वाघोले यांनी प्रहार चे जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड. पांडुरंग औताडे यांच्यामार्फत 2023 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता या विवाद अर्जामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, व ग्रामपंचायत यांना देखील पार्टी करण्यात आली होते यांचे लेखी म्हणणे तसेच अर्जदार यांचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून गोंडेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचे पद रद्द करण्यात आले आहे.