*चिंता वाढली! गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 90 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात केवळ 32 टक्के पाणी*

Jayakwadi water storage update : यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यातच पावसाने देखील पाठ फिरवल्याने मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील अनेक प्रकल्प कोरडी पडली आहे, तर इतर प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाले आहे. दरम्यान, मराठवाड्याची तहान भागावणारा जायकवाडी (Jayakwadi) धरणाचा पाणीसाठा (water storage) देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. कारण, गेल्यावर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणात 89.97 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा हाच पाणीसाठा 32.56 टक्के आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 
जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती!
धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1506.68 फूट 
धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.236 मीटर 
एकूण पाणीसाठा दलघमी : 1444.872 दलघमी
जिवंत पाणीसाठा दलघमी : 706.766 दलघमी
जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 32.56 टक्के 
मागील वर्षी आजच्या दिवशीचा
मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 1953.200 दलघमी
मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 89.97% टक्के 
जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.671 
जायकवाडी पाण्याची आवक क्युसेक : 2537  क्युसेक
1 जुन 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 188.23 दलघमी (06.65 टीएमसी)
1 जुन 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी
मराठवाड्यात आतापर्यंत पाऊस... (मिलिमीटरमध्ये) 
जिल्हा 
गतवर्षी झालेला पाऊस 
यावर्षी झालेला पाऊस 
गेल्या 24 तासातील पाऊस 
संभाजीनगर
359 
238
0.6
जालना 
461
252
0.8
परभणी 
449
273
0.1
नांदेड 
753
577
1


हिंगोली 
608
429
0.7


बीड 
667
240
0.3


उस्मानाबाद 
364
267
1.7


लातूर 
465
316
2.3



विभागात 78 टँकर सुरु 
पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात सध्या 55 गाव आणि 22 वाड्यावर 78  टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सात शासकीय आणि 71 खाजगी टँकरचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 28 गाव आणि 4 वाड्यांवर एकूण 35 टँकर सुरु आहेत. जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर एकूण 36 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
शेतकऱ्यांची चिंता वाढली...
मागील वर्षे सुरवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे यंदा तरी चांगले उत्पादन होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल झाले. त्यातच आता जुलै महिना संपला असतांना देखील नांदेड जिल्हा सोडला तर विभागात अजूनही कोठेही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.